Amar Musale
Tuesday, September 27, 2022
Wednesday, March 3, 2010
तिचं सौंदर्य

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी
पाहिलेलं ते एक सुंदर स्वप्नच होत
कारण……..त्या दिवशी
‘ ती ‘ मला प्रथमच भेटलेली
सौम्य रंगाची चुडीदार परिधान
केलेली………….
ती एक सुंदर परीच होती
गोरया गालावर पडणारी ‘ती’
नाजुकशी खळी,
मला माझ्या अस्तित्वापासून
दूर नेत होती….
कपाळावरून नाकापर्यंत लोंबकळनारे
केसांचे स्वरूप सौंदर्यात भर टाकीत होते…
उजव्या गालाच्या मध्यावर दिसणारी
ती लाल झालेली तारुण्यपिटिका
चीरतारुण्याची साक्षच देत होती
किती सुंदर दिसत होती ‘ती’?
पुढे जाऊन तिला तिचे नाव विचारू म्हटले
पण; मुद्दामच गेलो नाही
कारण, माझ्याशी बोलण्याच्या तोऱ्यात
कदाचित……
ती तिचं सौंदर्य हरवून बसली असती…!!!
-अमर मुसळे
Subscribe to:
Posts (Atom)